साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा चित्रमय जीवनपट पुस्तक रुपातून समोर… चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

पुणे : ‘एआय’ म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाचा वापर करुन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा चित्रमय जीवनपट पुस्तक रुपातून समोर आणण्याचे काम संजय कांबळे या उदयोन्मुख तरुणाने केले आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त या पुस्तकाचे प्रकाशन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ‘एआय’ म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता हे सद्या जगभरात वेगाने विकसित होणारे तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मानवी बुद्धिमत्तेसारखे शिकण्याची क्षमता मशीन्समध्ये आणि त्या मशीनमधल्या सॉफ्टवेअर प्रोग्रॅम्समध्ये तयार करण्यासाठी वापरले जाते. याद्वारे भूत, भविष्य आणि वर्तमान काळातील चित्र उभारले जाऊ शकते. या तंत्रज्ञानाचा सर्वच क्षेत्रात झपाट्याने विकास होत असल्याने साहित्य क्षेत्रात देखील वापर सुरू झाला आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करुन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा चित्रमय जीवनपट पुस्तक रुपातून समोर आला आहे. या पुस्तकाचे प्रकाशन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रथम चंद्रकांत पाटील यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ माने, शितल पवार, श्रीधर कांबळे, संजय कांबळे, अतुल दीक्षित, भाजपा कोथरूड दक्षिण मंडल अध्यक्ष संदीप बुटाला यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.