वनाज शाळेतील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून निःशुल्क शिव-सृष्टी पाहण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ… शिवचरित्राचा प्रचार आणि प्रसारात हा उपक्रम मोलाची भर घालेल – चंद्रकांत पाटील
पुणे : अखंड हिंदुस्थानाचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या महापराक्रमाची साक्ष देणाऱ्या वाघनखांचे दर्शन पुणेकरांना घेता यावे, यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी निःशुल्क शिव-सृष्टी पाहण्याची अनोखी संधी कोथरुडकरांना उपलब्ध करून दिली आहे. या उपक्रमाचा शुभारंभ गुरुवारी कोथरुड मधील वनाज शाळेतील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून झाला.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, स्वराज्याचा ध्यास आणि सुराज्याची आस यांचा सुवर्ण संगम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्य! महाराजांचे हे जीवनकार्य पुढील पिढीमध्ये रुजविण्यासाठी शिवसृष्टी मोफत दाखविण्याचा उपक्रम कोथरुड मध्ये हाती घेतला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ गुरुवारी कोथरुड मधील वनाज शाळेतील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून झाला. शिवसृष्टीत उभारण्यात आलेले शिवचरित्रातील प्रसंग पाहण्यात हे सर्व बालमित्र अतिशय तल्लीन झाले. शिवचरित्राचा प्रचार आणि प्रसारात हा उपक्रम मोलाची भर घालेल असा विश्वास वाटत असल्याचे पाटील म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांनी निःशुल्क शिव-सृष्टी पाहण्याची अनोखी संधी कोथरुडकरांना उपलब्ध करून दिली आहे. कोथरुडकरांना हि अनोखी संधी उपलब्ध करून देताना विलक्षण आनंद वाटत असल्याचे पाटील यांनी म्हटले. यासाठी त्यांच्या कोथरूड आणि बाणेर येथील नावनोंदणी करण्यासाठी सांगण्यात आले होते.