समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सेवा हाच आमचा ध्यास… चर्मकार समाजाच्या मेळाव्यात चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य

पुणे : भारतीय जनता पक्ष दक्षिण कोथरुड मंडल यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चर्मकार समाजाच्या मेळाव्यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गटई कारागिरांना मोफत छत्रीचे वाटप करण्यात आले. दरम्यान, समाजाचा सर्वांगीण विकासासाठी सेवा हाच आमचा ध्यास असून, त्यासाठी गेल्या चार वर्षांपासून कोथरूड मधील वेगवेगळ्या घटकांसाठी सेवा कार्य सुरू आहे. हे सेवा कार्य असेच अविरतपणे सुरू राहील असा विश्वास यावेळी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले कि, चर्मकार समाजाला रस्त्यावर बसून जे काम करावं लागत, ते काम करत असताना पाऊस असतो, ऊन असतं तरी तो काम करत असतो. तर त्याला एक चांगलं छत दिलं पाहिजे, म्हणून एक चांगली छत्री देण्याचे ठरले. पाटील म्हणाले कि समाजामध्ये जी कमतरता आहे ती आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यावेळी पाटील यांनी सरकारकडून सुरु करण्यात आलेल्या सोयी सुविधांबद्दल माहिती दिली. यामध्ये फिरते वाचनालय, फिरत दवाखाना, लहान मुलांसाठी वाचनालय अशा सोयी सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. याचा अनेक जण लाभ घेत आहेत. अशाच प्रकारे सेवा कार्य असेच अविरतपणे सुरू राहणार असे पाटील यावेळी म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर चर्मकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र खैरे, प्रसिद्ध उद्योजक महेश तावरे, निवृत्त सनदी अधिकारी वसंत सोनावणे, भाजपा प्रदेश सचिव वर्षा डहाळे, कोथरूड दक्षिण मंडल अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, सरचिटणीस प्रा. डॉ. अनुराधा एडके, गिरीश खत्री, दीपक पवार, निवडणूक सह समन्वय नवनाथ जाधव, माजी नगरसेविका ॲड. मिताली सावळेकर, कार्यक्रमाचे संयोजक निलेश सोनावणे, अमर वाघमारे, आशुतोष वैशंपायन यांच्या सह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.