ज्येष्ठ कलाकारांसाठी विरंगुळा केंद्राच्या उभारणीसाठी सर्वतोपरी सहकार्य करु, चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

53

पुणे : ऑल आर्टिस्ट फाउंडेशन महाराष्ट्रच्या वतीने पुण्यातील ज्येष्ठ कलाकारांसाठी स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून सर्वांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी फाउंडेशनने ज्येष्ठ कलाकारांसाठी विरंगुळा केंद्राची मागणी चंद्रकांत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. त्यांची ही मागणी रास्त असून फाउंडेशनने यासाठी जागा सुचवल्यास, विरंगुळा केंद्राच्या उभारणीसाठी सर्वतोपरी सहकार्य करु, अशी ग्वाही पाटील यांनी दिली. तसेच, ज्येष्ठ कलाकारांच्या समस्यांसंदर्भात राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत लवकरच बैठक करु, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

यावेळी व्यासपीठावर भाजपा प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, ऑल आर्टिस्ट फाउंडेशन महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष योगेश सुपेकर, मेलडी मेकर्स चे अशोककुमार सराफ, ज्येष्ठ कलावंत सुनील गोडबोले, रजनी भट, जयमाला इनामदार,प्रसिद्ध निवेदक संदीप पाटील,सुबोध चांदवडकर, इकबाल दरबार यांच्या सह संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.