कोथरुडमध्ये श्रीसंत नामदेव शिंपी समाज पश्चिम विभाग यांच्यावतीने आयोजित मेळाव्यास चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती
पुणे : संतशिरोमणी नामदेव महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त शुक्रवारी कोथरुडमध्ये श्रीसंत नामदेव शिंपी समाज पश्चिम विभाग यांच्यावतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी राज्यसरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती दिली.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी संतशिरोमणी नामदेव महाराजांना अभिवादन केले. यावेळी समाज बांधवांशी संवाद साधताना राज्य सरकारने महिला स्वावलंबनासाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना यांसह मुलींना मोफत व्यवसायिक शिक्षण, यांसह अनेक निर्णय घेतल्याचे अधोरेखीत केले. अशा विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही पाटील यांनी याप्रसंगी केले.
यावेळी प्रसिद्ध वास्तू विशारद आनंद पिंपळकर, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष प्रशांत हरसुले, भाजपा कोथरुड मंडल अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, संघटनेचे उपाध्यक्ष भारत चुंबळकर, हरिश पानसरे , रत्नाकर निरगुडे, पंकज सुत्रावे, वंदना कोर्टीकर यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.