सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या खबरदारीमुळे तसेच उत्तम नियोजनामुळे यंदाची वारी ही विक्रमी गर्दीची आणि उत्तम नियोजनाची वारी ठरली – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
सोलापूर : आषाढी वारीचा सोहळा नुकताच पंढरपुरात पार पडला. महाराष्ट्रासह देशभरातील वारकरी विठ्ठल नामाचा जयघोष करत पंढरपुरात दाखल झाले होते. शेकडो वर्ष सुरू असलेला हा सोहळा यंदाही उत्तम नियोजनाने सुरळीत पार पडला. यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी सर्वांचे कौतुक करत आभार मानले.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या खबरदारीमुळे तसेच उत्तम नियोजनामुळे यंदाची वारी ही विक्रमी गर्दीची आणि उत्तम नियोजनाची वारी ठरली. ज्यांच्या सुयोग्य नियोजनाने यंदाचा आषाढी सोहळा यशस्वी झाला अशांचा गौरव सोहळा शनिवारी सोलापूर येथील दमाणी नगर येथे आयोजित करण्यात आला होता. दरम्यान या सोहळ्यास उपस्थित राहून पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांनी पंढरपूर नगरपरिषद प्रशासन, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन यांच्या कामाचे कौतुक करून त्यांचे आभार व्यक्त केले.
यंदाची वारी हि मोठ्या उत्साहात पार पडली. यामध्ये कुठल्याही प्रकारचे गालबोट लागले नाही. खेड्यापाड्यातून आलेली हजारो भाविकांनी वारीचा अतिशय उत्तम आनंद लुटला. त्यामुळे हि वारी उत्तम पार पडणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे, अधिकाऱ्यांचे अभिनंदन.