चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या नामदार करंडक २०२४’ (पर्व दुसरे) आंतर सोसायटी एकांकिका स्पर्धा उत्साहात सुरु
पुणे : गत वर्षाप्रमाणेच याहीवर्षी ‘नामदार करंडक २०२४’ (पर्व दुसरे) आंतर सोसायटी एकांकिका स्पर्धा उत्साहात सुरु झाल्या आहेत. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून भाजपा सांस्कृतिक आघाडीमार्फत आयोजित करण्यात आलेली हि स्पर्धा त्याच जल्लोषात, त्याच उत्साहात सोमवार दिनांक ५ ऑगस्ट ते ९ ऑगस्ट २०२४ दरम्यान यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पुणे येथे संपन्न होत आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या या स्पर्धेत कोथरूड, बाणेर, बालेवाडी, पाषाण परीसरातील सोसायट्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे. विशेष म्हणजे आबाल वृध्द देखील मोठ्या उत्साहाने सादरीकरणामधे सहभागी झाले आहेत. तरी अधिकाधिक पुणेकरांनी उपस्थित राहून सहभागी कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन पाटील यांनी केले.