श्रावण महोत्सवाच्या माध्यमातून सर्व माता-भगिनींचे एकत्रिकरण करुन, त्यांना त्यांचा आनंद साजरा करु देणं हा उपक्रमाचा उद्देश – चंद्रकांत पाटील

26

पुणे : मागीलवर्षाप्रमाणे याही वर्षी कोथरुड विधानसभा मतदारसंघातील महिलांकरिता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने श्रावण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाअंतर्गत कोथरुड मतदारसंघातील महिलांसाठी मंगळागौर स्पर्धा आणि पाककला स्पर्धेचे आयोजन केले गेले. या महोत्सवात ज्येष्ठ महिलांसह लहान मुलींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

श्रावण महोत्सवाच्या माध्यमातून सर्व माता-भगिनींचे एकत्रिकरण करुन, त्यांना त्यांचा आनंद साजरा करु देणं हा उपक्रमाचा उद्देश असल्याचे चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले. गणेशोत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे प्रत्येक घरांमध्ये गौराईचे आगमन होईल. त्यांच्या तयारीत पुन्हा माता भगिनी उत्साहाने सहभागी होतील. त्यांचा हा आनंद पुन्हा द्विगुणित व्हावा, या अनुषंगाने कोथरुड विधानसभा मतदारसंघात “गौराई सजावणे” अशा खास स्पर्धेचे आयोजनही करण्यात येईल, अशी घोषणा यावेळी पाटील यांनी केली.

यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री भार्गवी चिरमुले, भाजपा कोथरुड मंडल अध्यक्ष संदीप बुटाला, प्रसिद्ध शेफ सर्वेश जाधव, मंदार जोग, मगंळागौर स्पर्धेच्या परिक्षिका नेहा दांडेकर, सविता जोशी, सुप्रिया ताम्हाणे, तेजस्विनी पिसाळ, यांसह महोत्सवाच्या संयोजिका माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, अँड. मिताली सावळेकर, अमृता देवगावकर, उमा गाडगीळ, अँड. प्राची बगाटे, अस्मिता करंदीकर, हर्षाली माथवड, वृषाली चौधरी, कांचन कुंबरे, अनुराधा एडके, कल्पना पुरंदरे, वर्षा पाटील, जयश्री तलेसरा, मनिषा बुटाला, अनिता तलाठी, अपर्णा लोणारे, विद्या टेमकर, रमा डांगे, गौरी करंजकर, जान्हवी जोशी, अस्मिता आपटे, सुरेखा डाबी, कविता निंबोळकर, समृद्धी वेलणकर यांच्यासह भाजपाच्या सर्व महिला पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.