गाव आणि या गावांचे व्यवस्थापन पाहणारे सरपंच म्हणजे देशाचा कणा, दैनिक प्रभातच्या आदर्श सरपंच पुरस्कार सोहळ्यात चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य

21

पुणे : गाव आणि या गावांचे व्यवस्थापन पाहणारे सरपंच म्हणजे देशाचा कणा! संपूर्ण गाव सांभाळणाऱ्या या सरपंचांच्या कार्याचा दैनिक प्रभातच्या वतीने आदर्श सरपंच पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. आगामी काळ हा स्त्री शक्तीचा आहे. गावातील महिलांचा समाजकार्यात वाढत सहभाग, गावाच्या विकासात, समाजकार्यात वाढत सहभाग हे कौतुकास्पद आहे. त्यामुळे, महिला सक्षमीकरणासाठी सर्वांनी काम करावे अशा शुभेच्छा यावेळी पाटील यांनी दिल्या.

पाटील यावेळी म्हणाले राज्य सरकार, केंद्र सरकारच्या अशा अनेक योजना आहेत ज्या गावच्या सरपंचानी पुढाकार घेत आपल्या गावात आणल्या पाहिजेत. देशाचा कणा म्हणजे गाव, आणि गावांचे व्यवस्थापन करणारे असतात ते सरपंच. संपूर्ण गाव सांभाळणाऱ्या सरपंचांचा गौरव आदर्श पुरस्कार देऊन गौरव करण्याचा विचार दैनिक धरला. आज जिल्ह्यात ३७ सरपंचांचा गौरव करण्यात येत असल्याचे पाटील यांनी सांगितले.

शुभारंभ लॉन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या या पुरस्कार सोहळ्याचे यंदाचे दुसरे वर्ष. यावेळी ‘प्रभात’चे अध्यक्ष डॉ. हर्षद गांधी, कार्यकारी संपादक अविनाश भट, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, हिंदुस्थान फिड्सचे अजय पिसाळ, मुरलीधर जगताप, अरुण मराठे हे देखील उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.