सतराव्या जागतिक तायक्वांदो कल्चर एक्स्पो २०२४ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कोथरुड मधील खेळाडुंनी सुवर्णमय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची चंद्रकांत पाटील यांनी भेट घेत केले अभिनंदन
पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील आपल्या मतदारसंघात विविध सोयीसुविधा पुरवत असतात. प्रत्येक क्षेत्रात ते स्वतः लक्ष घालून त्याबाबत पुढाकार घेत काम करतात. महिला , मुले, खेळाडू यांना कुठल्याही गोष्टीची कमी भासणार नाही यासाठी जातीने लक्ष घालतात, तसेच त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल देखील घेतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे दक्षिण कोरियामध्ये झालेल्या सतराव्या जागतिक तायक्वांदो कल्चर एक्स्पो २०२४ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कोथरुड मधील खेळाडुंनी सुवर्णमय कामगिरी केली, त्या सर्व खळाडून भेटून त्यांचे अभिनंदन केले.
दक्षिण कोरियामध्ये झालेल्या सतराव्या जागतिक तायक्वांदो कल्चर एक्स्पो २०२४ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कोथरुड मधील खेळाडुंनी सुवर्णमय कामगिरी केली असून, ‘योधी तायक्वांदो अकादमी’ मधील सात खेळाडुंनी सुवर्ण, सात रौप्य आणि आठ खेळाडुंनी कांस्य पदकाची कमाई करत या स्पर्धेत भारताचा झेंडा अभिमानाने फडकवला आहे. चंद्रकांत पाटील यांनी या सर्व खेळाडूंच्या पाठीवर कौतुकाची थाप म्हणून त्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.