भविष्यातही माता भगिनींना स्वावलंबी बनविण्यासाठी कटिबध्द राहणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

34

पुणे : भाजप कोथरुड उत्तर मंडलच्या वतीने श्रावण महिन्यानिमित्त पाषाण मधील कुंदन हॉल येथे महिला व्यावसायिकांसाठी प्रदर्शन आणि विक्री महोत्सवाचे आयोजित करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उदघाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी मधील लघु उद्योजिका भगिनींनी यात सहभाग घेतला.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले कि, माता भगिनींना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रोत्साहन देणे, ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. या अनुषंगाने कोथरुड मतदारसंघात अनेक उपक्रम राबविले आहेत. भविष्यातही माता भगिनींना स्वावलंबी बनविण्यासाठी कटिबध्द राहणार असल्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

यावेळी भाजप कोथरुड दक्षिणचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, भाजपा शहर सरचिटणीस पुनीत जोशी, उमाताई गाडगीळ, उत्तरच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा अस्मिता करंदीकर, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, प्रकाशतात्या बालवडकर, लहु बालवडकर, राहुल कोकाटे, सचिन दळवी, रोहन कोकाटे, दीपक पवार, वैदेही बापट, विजया चांदोरकर यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.