कोथरुड विधानसभा मतदारसंघातील प्रथितयश व्यक्तींनी इहलोकाचा निरोप घेतला, त्यांच्या कुटुंबीयांची चंद्रकांत पाटील यांनी घेतली भेट
पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील शनिवारी पुणे दौऱ्यावर होते. दरम्यान त्यांनी कोथरुड विधानसभा मतदारसंघातील अनेक प्रथितयश व्यक्तींनी इहलोकाचा निरोप घेतला त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, मागील काही दिवसांत माझ्या कोथरुड विधानसभा मतदारसंघातील अनेक प्रथितयश व्यक्तींनी इहलोकाचा निरोप घेतला. यात सुतारवाडीतील निलेश कोकाटे, नंदू शेठ कोकाटे, अशोक (अप्पा) बालवडकर यांचा समावेश आहे. या प्रसंगामुळे त्यांच्या कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या सर्व कुटुंबियांची पाटील यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. दु:खाच्या या काळात आम्ही सर्व आपल्या पाठिशी आहोत, असा धीर देखील त्यांनी दिला.
यावेळी भाजप उत्तर मंडल अध्यक्ष सचिन पाषाणकर, लहू बालवडकर, प्रकाशतात्या बालवडकर, राहुल कोकाटे, रोहन कोकाटे, शिवम सुतार, सचिन दळवी उपस्थित होते.