केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या श्री साई मित्र मंडळ, कोथरूड या मंडळाचा स्तंभपूजन कार्यक्रम चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न
पुणे : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या श्री साई मित्र मंडळ, कोथरूड या मंडळाचा स्तंभपूजन कार्यक्रम आज पार पडला. याप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
चंद्रकांत पाटील म्हणाले कि, यावर्षीच्या गणेशोत्सवासाठी मंडळाकडून पुरी जगन्नाथ मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येत आहे. त्यामुळे यंदा कोथरुडकरांना भगवान जगन्नाथांच्या दर्शनाची संधी मिळणार आहे.
या कार्यक्रमास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, मूर्तीशास्त्र अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर, हभप चंद्रकांत महाराज वांजळे, इस्कॉनचे संजयजी भोसले यांच्यासह मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.