चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कॅप्टन मुरलीकांत पेठकर यांना ‘थोरले शौर्य पुरस्कार- २०२४’ हा मानाचा पुरस्कार प्रदान
पुणे : श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या ३२४ व्या जयंतीनिमित्त श्रीमंत बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा ‘थोरले शौर्य पुरस्कार- २०२४’ यंदा पद्मश्री कॅप्टन मुरलीकांत पेठकर यांना जाहीर झाला. पुणे येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला.
पुणे येथे पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यास चंद्रकांत पाटील यांनी कॅप्टन मुरलीकांत पेठकर यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान केला. तसेच या पुरस्काराबद्दल कॅप्टन पेठकर यांना भरभरून शुभेच्छा दिल्या.
पद्मश्री मुरलीकांत पेटकर भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. युद्धात गंभीर जखमी होऊन त्यांना अपंगत्व आले. तरीही खचून न जाता जलतरण क्षेत्रात दैदीप्यमान कामगिरी करून पॅरालिम्पिक स्पर्धेत स्वर्ण पदक प्राप्त केले. असे पदक मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले.
यावेळी खासदार प्रा.डॉ.मेधाताई कुलकर्णी, मूर्तीशास्त्र अभ्यासक डॉ.गो.बं.देवरुलकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष एअर मार्शल (नि.)भूषण गोखले, कुंदन साठे, पेशव्यांचे वंशज पुष्कर पेशवा यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.