पुणे शहर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्यावतीने रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला ‘लाडक्या बहीणींचा देवाभाऊ’ कार्यक्रमास चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती
पुणे : पुणे शहर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्यावतीने रविवारी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला ‘लाडक्या बहीणींचा देवाभाऊ’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यसभेच्या खासदार मेधाताई कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी माता भगिनींशी संवाद साधला.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, महिला सक्षमीकरणासाठी महायुती सरकारने घोषित केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा तीन हजार रुपयांचा पहिला हप्ता महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या खात्यात जमा झाला. या योजनेबद्दल माता-भगिनींच्या मनातील भावना जाणून घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील लाडक्या बहिणींशी संवाद साधत आहेत. या उपक्रमाला व्यापक स्वरूप देण्यासाठी पुण्यातील भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाने पुढाकार घेत ‘लाडक्या बहिणींचे लाडके देवाभाऊ’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी अनेक भगिनींनी राखी बांधत आपले प्रेम व्यक्त केले.
महिला मोर्चाच्या पुणे शहर अध्यक्ष हर्षदाताई फरांदे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी शहराध्यक्ष धीरज घाटे देखील उपस्थित होते. अनेक महिला यामध्ये सहभागी झाल्या.