चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड मधील विविध रिक्षास्टॅंडना भेटी देऊन सत्यनारायणांचे घेतले दर्शन
पुणे : श्रावण महिना म्हणजे व्रतवैकल्यांचा महिना! आपल्या हिंदू संस्कृतीत या महिन्यात अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. पुण्यात या महिन्यात रिक्षाचालकांकडून अनोखी परंपरा साजरी केली जाते. रिक्षा स्टँड परिसरात सत्यनारायण पूजन करुन रिक्षांचीही पूजा केली जाते. या निमित्ताने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विविध रिक्षा स्टॅण्डन भेट देऊन सत्यनारायणाच्या पूजेचे दर्शन घेतले.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, पुणे शहरात या महिन्यात एक आगळीवेगळी परंपरा जतन केली जाते. पुण्यातील असंख्य रिक्षाचालक एकत्रित येऊन आपापल्या भागातील रिक्षा स्टँड परिसरात सत्यनारायण पूजन करुन रिक्षांचीही पूजा करतात. चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुड मतदारसंघातही या परंपरेचे जतन होते. याच उपक्रमाच्या निमित्ताने कोथरूड मतदारसंघाचे आमदार म्हणून पाटील यांनी विविध रिक्षा स्टँडना भेट देऊन भगवान सत्यनारायणांचे दर्शन घेऊन मनोभावे पूजा केली.