ढोल – ताशा पथकांना भविष्यात कशाचीही गरज पडली तर आपण आहोत, चंद्रकांत पाटील यांची ग्वाही
पुणे : जुलै महिन्यात पुण्यातील धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुळा-मुठा नदी दुथडी भरून वाहू लागल्या. यामुळे नदीकाठच्या अनेक ढोल-ताशा पथकांचे साहित्य वाहून गेले. परिणामी, ढोल ताशा वादकांचा मोठा हिरमोड झाला. हि माहिती मिळताच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी या पथकांना नवीन ढोल-ताशा उपलब्ध करुन दिले. याबाबत वंदे मातरम् संघटनेतील सर्व कलाकारांनी कृतज्ञता व्यक्त केली.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, पुणे म्हणजे देशाची सांस्कृतिक राजधानी! जुलै महिन्यात पुण्यातील धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुळा-मुठा नदी दुथडी भरून वाहू लागल्या. यामुळे नदीकाठच्या अनेक ढोल-ताशा पथकांचे साहित्य वाहून गेले. परिणामी, ढोल ताशा वादकांचा मोठा हिरमोड झाला. मोठ्या उत्साहाने त्यांनी सराव सुरू केला होता. पण मुसळधार पावसाने त्यांच्या उत्साहावर अक्षरशः पाणी फेरले. आता पुन्हा सराव सुरू करायचा, तर ढोल-ताशे उभे करायचे कसे? हा यक्ष प्रश्न पथकांसमोर होता. ही माहिती पाटील यांना मिळताच सर्व ढोल ताशा पथकांना धीर देऊन पुन्हा उभे राहण्याचे बळ दिले. नवीन ढोल-ताशा उपलब्ध करुन दिले. त्याबद्दल वंदे मातरम् संघटनेतील सर्व कलाकारांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी पाटील यांनी पथकातील सर्वांना मार्गदर्शन करून नवी उमेद दिली. अन् भविष्यात कशाचीही गरज पडली तर आपण आहोत याची ग्वाही देखील दिली. या ग्वाहीमुळे ढोल ताशा पथकातील सर्व कलाकारांच्या चेहऱ्यावर उमलले हसू सुखावणारे होते, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.