सहकारी गृहनिर्माण सोसायटीतील सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या सोसायटीच्या विकासासोबत आसपासच्या परिसराच्या विकासासाठी प्रयत्न करणं आवश्यक – चंद्रकांत पाटील

18

पुणे : पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट महासंघ मर्या. यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव केला. तसेच, सहकारी गृहनिर्माण सोसायटीतील सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या सोसायटीच्या विकासासोबत आसपासच्या परिसराच्या विकासासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे, अशी भावना यावेळी पाटील यांनी व्यक्त केली.

चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, कोथरुडमध्ये अनेक सोसायट्यांचा पुनर्विकास होत आहे. सोसायट्यांचा विकास होत असताना सदस्यांना डिम्ड कन्व्हेयन्स, प्रॉपर्टी कार्ड अशा विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. ही समस्या जाणून तज्ज्ञ वकिलांची एक टीम उभारुन; सभासदांना मोफत कायदेशीर सल्ला उपलब्ध करून दिला. त्याचा अनेकांना लाभ झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी राज्यसभा खासदार डॉ.प्रा.मेधाताई कुलकर्णी, विद्याधर अनास्कर, सुहास पटवर्धन आदी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.