चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जन्माष्टमी सोहळ्यानिमित्त पिंपरी -चिंचवड मधील नवीन इस्कॉन मंदिरात इस्कॉन टॉवरच्या प्रतिकृतीचे अनावरण
पुणे : श्रीकृष्ण जन्माष्टमी हा दिवस म्हणजे भगवान श्रीकृष्ण यांच्या भक्तांसाठी आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस. या निमित्ताने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पिंपरी -चिंचवड मधील नवीन इस्कॉन मंदिरात भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घेतले. तसेच, सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या.
प्रेम, वात्सल्य, कर्तव्य, बंधुत्व, यांचा आदर्श वस्तुपाठ घालून देणाऱ्या भगवान श्रीकृष्णाची जन्माष्टमी. जन्माष्टमीच्या निमित्ताने सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. चंद्रकांत पाटील हे पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी पिंपरी -चिंचवड मधील नवीन इस्कॉन मंदिरात भेट दिली. येथेही जन्माष्टमीची जोरदार तयारी करण्यात आली होती. श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त बालगोपाळांनी सुंदर नृत्यवंदना सादर केली. चंद्रकांत पाटील यांनी या मंगलमय सोहळ्यादरम्यान मंदिर परिसरातील प्रस्तावित इस्कॉन टॉवरच्या प्रतिकृतीचे अनावरण केले.