लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सतोषा देवस्थान मंदिर ते टाकेवाडी या रस्त्याचे भूमिपूजन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न
सातारा : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सतोषा देवस्थान मंदिर ते टाकेवाडी या रस्त्याचे भूमिपूजन बुधवारी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण ,वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, टाकेवाडी गावातील विविध विकास कामांना 13 कोटी 20 हजार रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत . भूमिपूजन केलेल्या रस्त्याच्या कामासाठी 3 कोटी 50 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहेत, या रस्त्यामुळे भाविकांचा प्रवास सुखकर होणार आहे.
यावेळी माण-खटाव मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे ,माननीय मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव बालाजी खतगावकर , संजयशेठ गांधी , श्री सिद्धनाथ बँकेचे चेअरमन मा.जि. प. सदस्य अरुण गोरे , मा.जि.प. सदस्य अर्जुन तात्या काळे , मा. जि. प.सदस्य आंधळी गावचे सरपंच दादासाहेब काळे , माण पंचायत समिती मा. सभापती अतुलदादा जाधव , हरिश्चंद्र जगदाळे (नाना) , भाजपा जिल्हा उपाध्यक्ष किसनशेठ सस्ते , भाजपा माण-खटाव विधानसभा प्रमुख सोमनाथ भोसले , युवा नेते सिद्धार्थ गुंडगे , जालिंदर दडस , टाकेवाडी गावचे सरपंच निलेश दडस , उपसरपंच सौ. सीमा शिवाजी ताटे , श्री सतोषा देवस्थान ट्रस्टचे चेअरमन शंकर दडस, रामदास दडस , वि.वि.सो. चेअरमन मोहन दडस , शिवाजी ताटे व आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.