युवा उद्योजक सागर घोरपडे यांच्या श्री ऍग्रो ग्रुपच्या सुपर फॉस्फेट या खत कारखान्याचा भव्य उद्घाटन सोहळा चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न

19

सातारा : माण-खटाव मतदारसंघातील टाकेवाडी ता. माण येथे युवा उद्योजक सागर घोरपडे यांनी नव्याने सुरू केलेल्या श्री ऍग्रो ग्रुपच्या सुपर फॉस्फेट या खत कारखान्याचा भव्य उद्घाटन , शुभारंभ सोहळा महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत बुधवारी संपन्न झाला . शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी अशा प्रकारचे प्रकल्प आवश्यक आहेत, अशी भावना यावेळी पाटील यांनी व्यक्त केली.

विकसीत आणि आत्मनिर्भर भारत घडविणे हा देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प आहे. देश सर्वच क्षेत्रात स्वयंपूर्ण असावा असाही आग्रह आहे. त्यासाठीच नवउद्योजकांना बळ दिले जात आहे. सध्या आपल्या देशाला सुपर फॉस्फेट खतांची आयात करावी लागते. ही गरज ओळखून सातारा जिल्ह्यातील तरुण उद्योजक सागर घोरपडे यांनी सुपर फॉस्फेट खतनिर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. त्यांच्या या कारखान्याचे पाटील यांनी उद्घाटन करुन शुभेच्छा दिल्या. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी अशा प्रकारचे प्रकल्प आवश्यक आहेत, अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

यावेळी माण-खटाव मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे ,माननीय मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव बालाजी खतगावकर , आयकर आयुक्त नितीन वाघमोडे , प्रांत अधिकारी सो. उज्वला गाडेकर मॅडम, तहसीलदार विकास अहिर , संजय गांधी ,अरुण गोरे , अर्जुन तात्या काळे ,दादासाहेब काळे , अतुलदादा जाधव , हरिभाऊ जगदाळे , किसनशेठ सस्ते , सोमनाथ भोसले , युवा नेते सिद्धार्थ गुंडगे , टाकेवाडी चे सरपंच निलेश दडस , जालिंदर दडस यांच्या सह इतर मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.