ग्राहक आणि विक्रेते यांचा समान उत्कर्ष व्हावा या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या नवीन ‘समुत्कर्ष’ ग्राहकपेठेचे उदघाटन नामदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न
पुणे : ग्राहक आणि विक्रेते यांचा समान उत्कर्ष व्हावा या उद्देशाने नवीन ‘समुत्कर्ष’ ग्राहक पेठेची मुहूर्तमेढ आज कोथरुडमध्ये रोवली.या नव्या ग्राहकपेठेचे उदघाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर ही संस्था काम करणार असून, या मध्ये किराणा सामानासह महिला बचत गटांच्या उत्पादनांनाही व्यासपीठ मिळणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ‘समुत्कर्ष’ ग्राहक पेठेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी संपूर्ण पेठेची पाहणी केली. पाटील यांनी तेथील महिलांशी संवाद साधला तसेच त्यांना मार्गदर्शन देखील केले. पाटील यांनी काही उत्पादनाची खरेदी देखील केली.
यावेळी भाजप कोथरुड दक्षिणचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, भाजपा प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, हर्षाली माथवड, नवनाथ जाधव, दिनेश माथवड, वनिता काळे, समुत्कर्ष फाऊंडेशनचे धनंजय रसाळ, पार्थ मठकरी यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.