बाणेर-बालेवाडी-सुतारवाडी-पाषाण-सोमेश्वरवाडी भागातील विविध समस्यांसंदर्भात नामदार चंद्रकांत पाटील यांनी घेतली पुणे महापालिका आयुक्तांची भेट
बाणेर : बाणेर- बालेवाडी-सुतारवाडी-पाषाण-कोथरूड भागातील विविध समस्यांसंदर्भात,बाणेर-पाषाण लिंक रोड ३६ मीटर डी पी रस्ता, एव्हरी इस्टेट सोमेश्वरवाडी फुटपाथ, स्ट्रीट लाईट, डिव्हायडर, बाणेर सुस रोड कचरा प्रकल्प,बालेवाडी – वाकड रस्ता, स्मार्ट सिटी अंतर्गत झालेले प्रकल्प, पाणी प्रश्न याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पुणे महापालिका आयुक्तांची भेट घेतली. यावेळी काम लवकरात लवकर पूर्ण करावे, असे निर्देश चंद्रकांत पाटील दिले.
चंद्रकांत पाटील यांनी बाणेर-बालेवाडी-सुतारवाडी-पाषाण-सोमेश्वरवाडी भागातील विविध समस्यांसंदर्भात आज पुणे महापालिका आयुक्तांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी बालेवाडी-वाकड रस्त्याचे काम जलदगतीने पूर्ण करावे, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच, सुतारवाडीतील पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या नादुरुस्त असल्याने त्या तातडीने दुरुस्त कराव्यात, त्यासाठी आमदार निधीतून तरतूद करू असे देखील त्यांनी सूचित केले.
यावेळी भाजप कोथरुड उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, भाजपा नेते लहू बालवडकर, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, प्रकाश तात्या बालवडकर, राहुल कोकाटे, सचिन दळवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबुराव चांदोरे यांच्या सह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.