संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोथरूड मध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन… समाजाच्या विकासासाठी नेहमीच कटिबद्ध राहणार – चंद्रकांत पाटील
पुणे : संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी कोथरूड मध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून महाराजांना अभिवादन केले. तसेच समाजाच्या विकासासाठी नेहमीच कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही यावेळी पाटील यांनी दिली.
यावेळी भाजपा दक्षिणचे अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, भाजपा नेते गणेश वर्पे, गिरीश खत्री, प्रशांत हरसुले, नवनाथ जाधव, दत्ताभाऊ चौधरी, प्रकाशतात्या बालवडकर, नगरसेविका अल्पना वर्पे, मंजुश्री खर्डेकर, नाभिक समाज संघटनेचे अध्यक्ष मारुती आढाव, दिनकर चौधरी, बाळकृष्ण निढाळकर यांच्या सह समाज बांधव उपस्थित होते.
सेना महाराजांनी हजारो अभंगाची निर्मिती करून सैनपंथ नावाची चळवळ भारतात सुरु केली. हीच चळवळ आज महाराष्ट्रात वारकरी म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांनी नंतर अनेक मराठी अभंग रचले. परंतु आपल्या समतेची शिकवण संपूर्ण भारतात पसरावी या हेतूने नंतर ते संपूर्ण भारतात फिरले. पंजाबमध्ये असतांना त्यांनी अनेक पंजाबी भाषेत दोहे रचले. हेच दोहे मोठ्या आदराने शिखांचे तिसरे गुरू गुरू अर्जुन सिंह यांनी गुरु ग्रंथ साहेबा यांच्यात समाविष्ट केले. सध्या सेना महाराजांचे मराठी अभंग उपलब्ध आहेत.