कोथरुड मतदारसंघाचे ग्रामदैवत श्री म्हातोबा मंदिराच्या देवस्थान ट्रस्टच्या शेडचे रुपांतर भविष्यात पक्क्या बांधकामात करुन देण्याची चंद्रकांत पाटील यांची ग्वाही
पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुड मतदारसंघाचे ग्रामदैवत श्री म्हातोबा मंदिराच्या देवस्थान ट्रस्टने काही दिवसांपूर्वी मंदिर परिसरातील श्री गंगाराम सुतार सांस्कृतिक हॉलच्या पहिल्या मजल्यावर शेडची व्यवस्था करण्याची इच्छा व्यक्त केली होती. चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने तातडीने या शेडचे काम पूर्ण करण्यात आले. यांनी निमित्त एका छोट्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहत कीर्तनाचा आनंद घेत, नागरिकांशी संवाद साधला.
चंद्रकांत पाटील म्हणाले कि, देवस्थान ट्रस्टने व्यक्त केलेली ही इच्छा म्हणजे श्री म्हातोबांची सेवा करण्याचे भाग्य. त्यामुळे तातडीने या शेडचे काम पूर्ण करुन दिले. भविष्यात या शेडचे रुपांतर पक्क्या बांधकामात करुन देण्याची ग्वाही यानिमित्ताने पाटील यांनी दिली. तूर्तास आताची सेवा नम्रपणे श्री म्हातोबांच्या चरणी अर्पण करतो , असे पाटील म्हणाले.
यावेळी नुकतेच बिग बॉस सिझन पाच मधून घराबाहेर पडलेले सदस्य तसेच वारकरी सांप्रदायातील कीर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या कीर्तनाचा आनंद घेतला, तसेच त्यांना ज्ञानेश्वरी भेट दिली. घरोघरी ज्ञानेश्वरी या उपक्रमांतर्गत पाटील यांनी येथे उपस्थित असलेल्या नागरिकांना देखील ज्ञानेश्वरीचे वाटप केले.