शासनाने मुलींना व्यावसायिक शिक्षणात शुल्क माफीचा निर्णय घेतला, त्या अनुषंगाने विद्यार्थिनींनी शिक्षणावर भर द्यावा – चंद्रकांत पाटील

15

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सोमवारी पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या. पुण्यातील श्री साई एज्युकेशन यांच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास पाटील यांनी हजेरी लावून विद्यार्थ्यांचा सत्कार करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

पुण्यातील श्री साई एज्युकेशन यांच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभास चंद्रकांत पाटील उपस्थित राहिले. यावेळी त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. आगामी काळ हा महिलांचा आहे. त्यामुळे मुलींचे शैक्षणिक प्रमाण वाढविण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न सुरू आहेत. शासनाने मुलींना व्यावसायिक शिक्षणात शुल्क माफीचा निर्णय घेऊन मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. या अनुषंगाने विद्यार्थिनींनी शिक्षणावर भर द्यावा अशी भावना यावेळी पाटील यांनी व्यक्त केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.