चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने १००१ दाम्पत्यांकडून सामूहिक रुद्र पूजन कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याची सांगता येत्या काही दिवसात होणार आहे. या पार्श्वभूमीवर शेवटच्या सोमवारी भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील व भाजपचे कोथरूड विधानसभेचे सरचिटणीस गिरीश खत्री यांच्या शिवस्व प्रतिष्ठान तर्फे 1001 दाम्पत्यांचा सामूहिक रुद्र पूजन महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यामध्ये हजारो कोथरुडकरांनी सहभागी होऊन महा शिवसाधनेची अनुभूती घेतली.
चंद्रकांत पाटील म्हणाले कि, श्रावण महिना हा व्रत वैकल्यांचा महिना असून या महिन्यात विविध प्रकारची अनुष्ठाने आयोजित केली जातात. त्यानिमित्ताने पाटील यांनी पुढाकार घेत शिवस्व प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने १००१ दाम्पत्यांकडून सामूहिक रुद्र पूजन कार्यक्रमाचे आयोजन केले. यामध्ये हजारो कोथरुडकरांनी सहभागी होऊन महा शिवसाधनेची अनुभूती घेतली. पुण्यातील या सर्वात मोठ्या रुद्र पूजन महोत्सवात सपत्नीक सहभागी व्हा; असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले होते.
यावेळी परम पूज्य भाऊ महाराज परांडे, ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे, भाजप पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, कोथरुड दक्षिणचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, कार्यक्रमाचे संयोजक गिरीश खत्री, प्रजापिता ब्रह्मकुमारीचे साधक यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी शिवतांडव स्तोत्र आणि शिवस्तवन देखील सादर करण्यात आले.