‘विधानपरिषद शतकमहोत्सवा’निमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते ‘वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व’ ग्रंथाचे प्रकाशन तसेच उत्कृष्ट संसदपटू’ व ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्कारांचे वितरण
मुंबई : महाराष्ट्र विधान परिषद शतक महोत्सवा निमित्त विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांच्या हस्ते ‘वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. दरम्यान, महामहीम राष्ट्रपती मुर्मूजी यांच्या हस्ते ‘उत्कृष्ट संसदपटू’ आणि ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्कारांचे वितरणही करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, मंत्रिमंडळातील मंत्रीगण विधानसभा आणि विधानपरिषद सभागृहाचे आजी-माजी सदस्य उपस्थित होते.
महिलांच्या सहभागा शिवाय कोणतेही राष्ट्र, राज्य गतीमान प्रगती करु शकत नाही, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवत आहे, ही अभिनंदनीय बाब आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) महाराष्ट्राचं देशात पहिलं स्थान असून महाराष्ट्राची विकासयात्रा अशीच वेगाने पुढे जात राहील, असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केला. महाराष्ट्राच्या प्रशासनाच्या मुख्य पदावर महिला अधिकारी तर पोलिस प्रशासनाच्याही प्रमुख पदावर महिला अधिकारी सक्षमपणे कार्यरत आहे, ही निश्चितच अभिनंदनीय बाब असून महाराष्ट्राच्या लेकी निश्चितपणे देशाचा गौरव वाढवतील, असं प्रतिपादन राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांनी केलं.
‘उत्कृष्ट संसदपटू’ आणि ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्कारांचे वितरण यावेळी करण्यात आले; वर्षनिहाय पुरस्कार विजेत्या सदस्यांची नावे पुढील प्रमाणे –
सन २०१८-१९ विधानसभा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार – सदस्य सर्वश्री बाळासाहेब थोरात, डॉ. संजय कुटे उत्कृष्ट भाषण पुरस्कार – विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानसभा सदस्य पराग अळवणी.
विधान परिषद उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, सदस्य निरंजन डावखरे. उत्कृष्ट भाषण पुरस्कार – हुस्नबानू खलिफे, सुजितसिंह ठाकूर.
सन २०१९-२० विधानसभा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार – सदस्य प्रकाश आबिटकर, आशिष शेलार.
उत्कृष्ट भाषण पुरस्कार – सदस्य सुनील प्रभू, दिलीप मोहिते-पाटील.
विधान परिषद उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार – सतीश चव्हाण, अनंत गाडगीळ.
उत्कृष्ट भाषण पुरस्कार – रामहरी रूपनवार, श्रीकांत देशपांडे.
सन २०२०-२१ विधानसभा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार – अमित साटम, आशिष जयस्वाल.
उत्कृष्ट भाषण पुरस्कार – प्रताप सरनाईक, प्रकाश सोळंके.
विधान परिषद उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार – सदस्य प्रवीण दरेकर, दिवंगत सदस्य विनायक मेटे.
उत्कृष्ट भाषण पुरस्कार सदस्य – मनीषा कायंदे, बाळाराम पाटील.
२०२१-२२ विधानसभा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार – सदस्य संजय शिरसाट, प्रशांत बंब.
उत्कृष्ट भाषण पुरस्कार – सदस्य सरोज अहिरे, सिद्धार्थ शिरोळे.
विधान परिषद उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार – सदस्य अनिकेत तटकरे, सदाभाऊ खोत,
उत्कृष्ट भाषण पुरस्कार – गोपीकिशन बाजोरिया, विक्रम काळे
सन २०२२-२३ विधानसभा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार – सदस्य भरत गोगावले, चेतन तुपे, समीर कुणावार. उत्कृष्ट भाषण पुरस्कार – सदस्य यामिनी जाधव, अभिमन्यू पवार.
विधान परिषद उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार – सदस्य प्रसाद लाड, महादेव जानकर.
उत्कृष्ट भाषण पुरस्कार -सदस्य बाबाजानी दुर्राणी, प्रज्ञा सातव.
सन २०२३-२४ विधानसभा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार – सदस्य रमेश बोरनारे, अमिन पटेल, राम सातपुते.
उत्कृष्ट भाषण पुरस्कार – सदस्य कुणाल पाटील, श्वेता महाले, प्राजक्त तनपुरे.
विधान परिषद उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार – सदस्य अमोल मिटकरी, गोपीचंद पडळकर, रमेश पाटील.
उत्कृष्ट भाषण पुरस्कार – आमशा पाडवी, श्रीकांत भारतीय, सुनील शिंदे यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.