गणेश मंडळाने आगामी काळात आपल्या भागातील मुलींच्या शिक्षणावरही खर्च करावा, चंद्रकांत पाटील यांचे आवाहन
पुणे : कोथरुड मतदारसंघातील कर्वेनगर मधील हिंदू साम्राज्य प्रतिष्ठानने यंदाचा गणेशोत्सव आरोग्य सेवेसाठी समर्पित केला असून उत्सवासाठी जमलेल्या वर्गणीतून रुग्णवाहिका खरेदी केली आहे. या रुग्णवाहिकेचे लोकार्पण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, आपली संस्कृती माणसामध्ये परमेश्वर शोधायला शिकवते. लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला तो उद्देश समोर ठेवून मंडळाने आरोग्यसेवेचे व्रत हाती घेतले आहे. त्याबद्दल मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन. मंडळाने आगामी काळात आपल्या भागातील मुलींच्या शिक्षणावरही खर्च करावा, असे आवाहन यानिमित्ताने पाटील यांनी केले.
यावेळी मंडळाचे विजय भरत दाभाडे, विठ्ठल बराटे, दत्ताभाऊ चौधरी, वृषाली चौधरी यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.