राहुल गांधी यांनी आरक्षण रद्द करण्याच्या वक्तव्याच्या निषेधार्थ चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन
पुणे : राहुल गांधी यांच्या आरक्षण व संविधान विरोधी भूमिकेच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांचे खरे रूप अमेरिकेत दिसून आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांना दिलेले आरक्षण रद्द करणार असल्याची भूमिका त्यांनी जाहीरपणे मांडली आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. राहुल गांधी यांनी अमेरिकेत बोलताना, आरक्षण रद्द करण्याचे वक्तव्य केले. त्यामुळे आरक्षण रद्द करू पाहणाऱ्या राहुल गांधी आणि त्यांच्या काँग्रेस पक्षाचा यावेळी जाहीर निषेध करण्यात आला.
राहुल गांधी नेमकं काय म्हणाले ?
भारतात पक्षपातीपणा थांबेल तेव्हा आरक्षण संपवण्याचा विचार करु, असं राहुल गांधी म्हणाले आहेत. केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना, राहुल गांधींनी आरक्षणावरुन भाष्य केलं. पण त्याचवेळी पक्षपातीपणा थांबेल तेव्हा आरक्षण संपवण्याचा विचार केला जाईल हेही राहुल गांधी बोलले.