चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील मानाच्या गणपतींचे घेतले दर्शन… सर्वांना सुख, समृध्दी आणि आरोग्य लाभो, अशी केली प्रार्थना
पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पुण्यातील प्रसिद्ध गणेश मंडळांचे दर्शन घेतले. यसोबतच मानाच्या गणपतींचे दर्शन घेऊन सर्वांना सुख, समृध्दी आणि आरोग्य लाभो, अशी प्रार्थना केली.
चंद्रकांत पाटील यांनी प्रथम पुण्यातील मानाचा पहिला गणपती, श्री कसबा गणपतीचे दर्शन घेतले. श्रीगणरायाच्या चरणी लीन होऊन सर्वांना सुख, समृध्दी आणि आरोग्य लाभो, अशी प्रार्थना केली. पुण्यातील मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी, मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम , पुण्यनगरीतील मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपती बाप्पाचे दर्शन आणि आशीर्वाद घेतले. यावेळी गणपती बाप्पाकडे महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रार्थना केली. त्यानंतर गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप देणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या केसरीवाडा येथील मानाच्या गणपतीचे देखील त्यांनी दर्शन घेतला.
चंद्रकांत पाटील यांनी मानाच्या गणपतींसोबतच काही प्रमुख मंडळांच्या गणपतींचे देखील दर्शन घेतले. भाऊसाहेब रंगारी मंडळ, दर्शन मित्र मंडळ ट्रस्ट, साने गुरुजी तरुण मंडळ, अखिल मंडई मंडळाच्या शारदा गणेशाचे पाटील यांनी मनोभावे दर्शन घेतले. यासोबतच पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कोथरूड मधील श्रीसाई मित्र मंडळाच्या बाप्पांचे दर्शन घेऊन चंद्रकांत पाटील यांनी मनोभावे पूजा केली. सर्वांच्या सुख-समृद्धी व कल्याणासाठी गणराया चरणी प्रार्थना केली.