पुणेकरांसाठी पुणे-कोल्हापूर मार्गावर वंदे भारत १६ सप्टेंबर पासून होणार सुरु… प्रवाशांना ही अत्याधुनिक रेल्वे उपलब्ध करून दिल्याबद्दल रेल्वे मंत्रालयाचे मनःपूर्वक धन्यवाद – चंद्रकांत पाटील

54

पुणे : “वंदे भारत” या नव्या आणि अत्याधुनिक रेल्वेने नवा इतिहास घडवला आहे. मोदी सरकारच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने भारतीय रेल्वे प्रवाशांना उपलब्ध करून दिलेली ही एक उत्तम सुविधा. आता पुणेकरांसाठी पुणे-कोल्हापूर मार्गावर वंदे भारत १६ सप्टेंबर पासून सुरु होत आहे. वंदे भारत मुळे हा प्रवास अवघ्या पाच तासांत होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना ही अत्याधुनिक रेल्वे उपलब्ध करून दिल्याबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रेल्वे मंत्रालयाला मनःपूर्वक धन्यवाद दिले.

चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, देशाच्या विविध भागात धावणारी “वंदे भारत” पुणे – कोल्हापूर मार्गावर धावावी, अशी प्रवाशांची मागणी होती. त्यानुसार पाटील यांनी १रेल्वेला पत्र पाठवून पाठपुरावा केला होता. त्याला यश आले असून पुणे-कोल्हापूर मार्गावर वंदे भारत १६ सप्टेंबर पासून सुरु होत आहे. एरव्ही पुणे कोल्हापूर रेल्वे प्रवासाला सात ते साडेसात तास लागतात. वंदे भारत मुळे हा प्रवास अवघ्या पाच तासांत होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना ही अत्याधुनिक रेल्वे उपलब्ध करून दिल्याबद्दल रेल्वे मंत्रालयाला मनःपूर्वक धन्यवाद.

पुणे शहरातून अद्यापपर्यंत स्वतंत्र वंदे भारत ट्रेन नाही. परंतु आता पुण्यातून स्वतंत्र वंदे भारत येत्या सोमवारपासून सुरु होणार आहे. तसेच मुंबईवरुन कोल्हापूर जाणारी वंदे भारत ट्रेनही पुण्यावरुन जाणार आहे. यामुळे पुणेकरांना येत्या सोमवारपासून दोन वंदे भारत ट्रेन मिळणार आहे. मुंबईवरुन सातवी वंदे भारत ट्रेन सुरु होणार आहे. कोल्हापूर पुणे आणि पुणे हुबळी अशा दोन वंदे भारत एक्सप्रेस सुरु होत आहे. सोमवारी सकाळी आठ वाजता प्रवाशांना घेऊन वंदे भारत एक्सप्रेस कोल्हापुरातून पुण्याच्या दिशेने धावणार आहे. आठवड्यातून तीन दिवस असणार पुणे कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेस असणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.