महाराष्ट्र चित्पावन संघाच्या नूतन इमारतीतील अंतर्गत सजावटीच्या कामाचे लोकार्पण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न
पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांच्या हस्ते महाराष्ट्र चित्पावन संघाच्या नूतन इमारतीतील अंतर्गत सजावटीच्या कामाचे लोकार्पण करण्यात आले.
लोकसहभागातून पूर्णत्वास आलेल्या महाराष्ट्र चित्पावन संघाच्या नूतन इमारतीतील अंतर्गत सजावटीच्या कामाच्या लोकार्पण चंद्रकांत पाटील यांनी सपत्नीक केले. यावेळी भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर यांच्यासह चित्पावन संघटनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संपूर्ण इमारतीची पाटील यांनी पाहणी केली. यासोबतच उपस्थित पदाधिकाऱ्यांशी संवाद देखील साधला.