पुण्यातून निघालेल्या गणरायाच्या भव्य विसर्जन मिरवणुकीत चंद्रकांत पाटील यांनी घेतला सहभाग… जल्लोष आणि उत्साहपूर्ण वातावरणात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

19

पुणे : आज अनंत चतुर्दशी, अर्थात आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्याचा दिवस. आज गणपती बाप्पा गावाला निघाले असले, तरी आपल्या लेकरांचे आदरातिथ्य स्वीकारायला, त्यांची सर्व दुःख, संकटे दूर करण्यासाठी त्यांनी पुढील वर्षी लवकर यावे हीच मनोकामना, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीची सुरुवात मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात झाली, असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.

गणेश विसर्जन मिरणुकीपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी लोकमान्य टिळक आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केले. अनंत चतुर्दशी निमित्त पुणे शहरात विविध ठिकाणी पारंपरिक वाद्यांच्या तालावर गणेश भक्तांचा जल्लोष आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. हे वातावरण अतिशय ऊर्जादायी असलयाचे पाटील म्हणाले.

महात्मा फुले मंडई परिसरात पुण्यातील कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालिम मंडळ, श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, लोकमान्य टिळक गणेशोत्सव मंडळ केसरीवाडा या मानाच्या पाच गणपतीचे पूजन करुन दर्शन घेतले. त्यानंतर या मंडळाच्यावतीने विसर्जन मिरवणुकीस सुरु करण्यात आली. यावेळी पाटील यांनी ढोल वाजवण्याचा आनंद घेतला.

यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री अजित पवार , खासदार सुनेत्रा पवार, आमदार रवींद्र धंगेकर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे आदी उपस्थित होते.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.