पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळातच “एक देश, एक निवडणूक” प्रत्यक्षात येईल, हा विश्वास – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

17

मुंबई : .एक देश, एक निवडणूक या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे.मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात या विषयावर अभ्यास करण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. कोविंद समितीच्या अहवालाला कॅबिनेटनं मंजुरी दिली आहे. निवडणूक सुधारणांची सुरुवात केल्याबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना मनःपूर्वक धन्यवाद दिले.

चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, सतत येणा-या निवडणुका म्हणजे सततची आचारसंहिता. सततची आचारसंहिता म्हणजे सरकार आणि प्रशासनाच्या कामकाजातील सततचे अडथळे. सारख्या सारख्या निवडणुकांमुळे खरी अडचण होते, ती सामान्य नागरिकाचीच. “एक देश एक निवडणूक” प्रस्तावाला मान्यता देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने एका नव्या युगाच्या दिशेने आणि आणखी एका आश्वासनपूर्तीच्या दिशेने टाकलेले आश्वासक पाऊल आहे. आपल्या राक्षसी महत्वाकांक्षासाठी कॉंग्रेसने अनेक लोकनियुक्त राज्य सरकारांचा गळा घोटला. त्यामुळेच सततच्या निवडणुकांचे सत्र देशात सुरु झाले. ते लवकर संपणेच देशाच्या हिताचे आहे. मोदीजींच्या कार्यकाळातच “एक देश, एक निवडणूक” प्रत्यक्षात येईल, हा विश्वास असल्याचे पाटील यांनी म्हटले. निवडणूक सुधारणांची सुरुवात केल्याबद्दल पाटील यांनी नरेंद्र मोदीजी यांना मनःपूर्वक धन्यवाद दिले.

‘एक देश, एक निवडणूक’ याचा सरळ अर्थ, देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळस घेणे असा आहे. नागरिकांना या दोन्ही निवडणुकांसाठी एकाच वेळी मतदान करता येईल. ‘एक देश, एक निवडणूक’ झाल्यास सगळ्यात मोठा फायदा निवडणुकांवरील खर्च कमी होईल. निवडणुका एकाच वेळी घेतल्याने वेगवेगळ्या निवडणुकांवर करावा लागणार खर्च कमी होईल, असे म्हटले जात आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.