आजच्या युगात डिजिटल मीडिया हे अतिशय गतीमान माध्यम असून या माध्यमाचा समाज जीवनावरील परिणाम अतिशय प्रभावी – चंद्रकांत पाटील
पुणे : ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशन, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि आम्ही पुणेकर यांच्या संयुक्त विद्यमाने आज डिजिटल मीडिया कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी उपस्थित राहून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
चंद्रकांत पाटील हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. दरम्यान डिजिटल मीडिया कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी बोलताना ते म्हणाले, आजच्या युगात डिजिटल मीडिया हे अतिशय गतीमान माध्यम असून या माध्यमाचा समाज जीवनावरील परिणाम अतिशय प्रभावी आहे. त्यामुळे या माध्यमाचा विकास होत असताना त्याचे सिंहावलोकन आवश्यक असल्याची भावना यावेळी व्यक्त केली.
याप्रसंगी हेमंत जाधव, सिद्वार्थ भोकरे, समीर देसाई, संतोष फुटक, विकास माने, उल्का मोकासदार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.