महाराष्ट्रातील मनुष्यबळाला जर्मनीमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने इच्छुक उमेदवारांना प्रशिक्षण सुरू करण्याबाबत चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा
मुंबई : जर्मनीला कुशल मनुष्यबळ पुरवण्याबाबत झालेल्या सामंजस्य करारानुसार जर्मन भाषेच्या प्रशिक्षणासंदर्भात मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर या विद्यापीठासोबत सोमवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात बैठक संपन्न झाली.
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी महाराष्ट्रातील मनुष्यबळाला जर्मनीमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने इच्छुक उमेदवारांना प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे याबाबत आढावा घेतला. या उपक्रमाचे कालबद्ध नियोजन करावे अशा सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी,शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव आय. ए. कुंदन,शालेय शिक्षण विभागाचे आयुक्त सुरज मांढरे ,तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर,उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, उपसचिव अशोक मांडे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.रवींद्र कुलकर्णी, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी,डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.वाल्मीक सरवदे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.