भारताची कीर्ती दशदिशात नेणारी “मेक इन इंडिया” योजना आज दहा वर्षांची झाली… या योजनेसाठी चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधान मोदींचे मानले आभार
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेली “मेक इन इंडिया” ही योजना, जी योजना भारताची कीर्ती दशदिशात नेणारी ही आज दहा वर्षांची झाली आहे. याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोदीजींचे आभार मानले आहेत. पाटील यांनी म्हटले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दहा वर्षांचा कार्यकाळ भारताचा सर्वांगीण उत्कर्ष करणारा आहे. भारतीय संसाधनांचा पुरेपूर वापर करून मोदीजीनी देशाच्या विकासाला गती दिली. स्वदेशी बुद्धिमत्ता, स्वदेशी कंपन्या हेच त्यांच्या धोरणांचे आधारस्तंभ राहिले आहेत. या सर्वांचा सुरेख संगम म्हणजे “मेक इन इंडिया” ही योजना. भारताची कीर्ती दशदिशात नेणारी ही योजना आज दहा वर्षांची झाली आहे.
पाटील पुढे म्हणाले,उत्पादन क्षेत्राला गती देणे आणि थेट विदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढवून अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या उद्देश्याने ही योजना सुरु करण्यात आली. भारत हे उत्पादन, आरेखन, नवता यांचे केंद्र बनविण्यासाठी “व्होकल फॉर लोकल” हा नारा देण्यात आला. या योजनेला गती देण्यासाठी प्रोडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव्ह अंतर्गत १. ९७ लाख कोटींचे अर्थसहाय्य देण्यात आले. या अंतर्गत ७५५ अर्ज दाखल झाले आणि १. २३ लाख कोटींच्या गुंतवणुकीसह गेल्या दशकात ८ लाख रोजगारांची निर्मिती झाली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळ देणाऱ्या, रोजगारांची निर्मिती करणाऱ्या, आणि उत्पादक देश म्हणून भारताची ओळख जगभरात निर्माण करू पाहणाऱ्या या योजनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना पाटील यांनी मनःपूर्वक धन्यवाद दिले.