केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमितभाई शाह यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम महाराष्ट्र विभाग, भाजपा कार्यकर्ता संवाद बैठक संपन्न

19

कोल्हापूर : कोल्हापूर येथे केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमितभाई शाह यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम महाराष्ट्र विभाग, भाजपा कार्यकर्ता संवाद बैठक संपन्न झाली. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच विधानसभा मतदारसंघातील खासदार, आमदार व पदाधिकारी यांना अमितभाई यांनी विधानसभा निवडणुकीची रणनीती व जास्तीत जास्त जागा कशा पद्धतीने निवडून आणता येतील व पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन होईल याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी केंद्रीय मंत्री व भाजपा महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव , राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे , केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यातील भाजपाचे खासदार, आमदार व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोल्हापूर दौऱ्यादरम्यान अमितजी शाह यांनी साडेतीन शक्तीपीठांपैकी एक करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरास भेट देऊन आईचे दर्शन देखील घेतले.

Get real time updates directly on you device, subscribe now.