पुणे-कोल्हापूर-हुबळी रेल्वे सेवेचा शुभारंभ करून दळणवळण यंत्रणा सक्षम केल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे विभागाचे मानले आभार

21

कोल्हापूर :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काही दिवसांपूर्वीच दूरदृष्यप्रणाली पद्धत्तीने हिरवा झेंडा दाखवून पुणे- हुबळी वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभ करण्यात आला. पुणे-कोल्हापूर आणि पुणे-हुबळी वंदे भारत एक्सप्रेस या गाड्यांमुळे नागरिकांचा प्रवास आता अधिक वेगवान, आरामदायी, आणि सुखकारक होणार आहे. विकसीत भारत घडवण्यासाठी दळणवळण यंत्रणा सक्षम करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने मोदी सरकार मेहनत घेत आहे. याचाच भाग म्हणून अलीकडे सुरू झालेल्या पुणे- कोल्हापूर-हुबळी रेल्वेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळात असल्याचे वक्तव्य उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

चंद्रकांत पाटील म्हणाले , ही ट्रेन सुरू झाल्यापासून आतापर्यंतच्या पाच दिवसांत या गाडीतून १ हजार ७१६ प्रवाशांनी प्रवास केला आहे. त्याद्वारे १७ लाख ७३ हजार ७३२ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. हा उच्चांक हे सेवेच्या यशाचे द्योतक आहे. पुणे-कोल्हापूर-हुबळी रेल्वे सेवेचा शुभारंभ करून दळणवळण यंत्रणा सक्षम केल्याबद्दल, अनेकांचा प्रवास सुखरूप केल्याबद्दल पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि रेल्वे विभागाचे मनःपूर्वक आभार मानले.

Get real time updates directly on you device, subscribe now.