महाकवी गदिमांच्या १०५ व्या जयंती निमित्त गदिमा लिखित गीत रामायणाचा हिंदी भावानुवाद कार्यक्रम चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने प्रथमच खास कोथरूडकरांसाठी
पुणे : आधुनिक वाल्मिकी, महाकवी गदिमांच्या १०५ व्या जयंती निमित्त गदिमा लिखित गीत रामायणाचा हिंदी भावानुवाद कार्यक्रम प्रथमच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी खास कोथरूडकरांसाठी आयोजित केला आहे.
पाटील यांनी माहिती दिली कि, रामायण म्हणजे केवळ एक महाकाव्य नाही, तर आदर्श जीवनाची शिकवण आहे. प्रभु श्रीरामांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग आपल्याला नीतिमूल्यांची आणि धर्माची शिकवण देतात. आधुनिक वाल्मिकी, महाकवी गदिमांच्या १०५ व्या जयंती निमित्त गदिमा लिखित गीत रामायणाचा हिंदी भावानुवाद कार्यक्रम कोथरूडकरांसाठी आयोजित केला आहे. हा प्रयोग दिनांक: १ ऑक्टोबर २०२४ ला सकाळी ९.३० ते १२.३० वा. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे येथे पाहता येणार आहे.
दत्तप्रसाद जोग, हृषीकेश रानडे यांच्या सुमधुर आवाजात या गीतरामायणाचे सादरीकरण केले जाणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड येथील जनसंपर्क कार्यालयात संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विनीत गाडगीळ- ९८२३२७६८९७, अनंत कंटक – ९८९०९२७४५० हे दोन संपर्क क्रमांक प्रसिद्ध करण्यात आले आहेत.