सांधे, मणके व स्नायूंच्या समस्या आणि मोफत आयुर्वेदिक सल्ला शिबिराचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न
पुणे : “वेदनामुक्त आयुष्य हेच कोथरूडचे भविष्य “या संकल्पनेतून वैद्य पुरूषोत्तमशास्त्री नानल रुग्णालय यांच्या सहकार्याने मतदारसंघातील नागरिकांसाठी आयोजित केलेल्या सांधे, मणके व स्नायूंच्या समस्या आणि मोफत आयुर्वेदिक सल्ला शिबिराचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले, ‘पंचकर्म आयुर्वेद’ ही चिकित्सा पद्धती प्राचीन काळापासून अस्तित्वात असून, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगातही त्याचे महत्त्व कमी झालेले नाही. त्यामुळे आजही सांधे, मणके व स्नायूंच्या आजारांवर आयुर्वेदिक उपचार फायदेशीर आहेत, याचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. दी. प्र. पुराणिक, वैद्य पु. शा नानल रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ विजय डोईफोडे, रुग्णालयाचे उपअधीक्षक डॉ. प्रमोद दिवाण, ऍड. श्रीकांत पाटील उपस्थित होते. या शिबिरात वैद्य गिरीश सरडे, वैद्य मोनिका मुळे, वैद्य जयश्री गाडगीळ, वैद्य शिवानी साटम यांनी रुग्ण तपासणी केली.