चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे शहर भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक बैठक संपन्न
पुणे : पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक बैठक शनिवारी पार पडली. या बैठकीत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यात आगामी विधानसभा निवडणुकीसह मेट्रो उद्घाटन आणि भूमिपूजन कार्यक्रमाच्या नियोजनासह विविध विषयांवर चर्चा झाली.
लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या हस्ते रविवारी २९ सप्टेंबर २०२४ रोजी पुणे मेट्रोच्या पहिल्या मार्गिकेवरील स्वारगेट ते जिल्हा न्यायालय सेवेचे लोकार्पण आणि स्वारगेट ते कात्रज टप्प्याचे भूमिपूजन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. पुण्यातील पावसामुळे पंतप्रधानांचा गुरुवारचा पुणे दौरा रद्द करण्यात आला होता. पण आता रविवारी पंतप्रधान या कार्यक्रमामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होणार आहेत, त्यानिमित्ताने हि बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी मध्यप्रदेशचे संघटन महामंत्री अजय जमवाल, राज्याचे माजी संघटन मंत्री. रघुनाथ कुलकर्णी, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष धीरज घाटे, आमदार माधुरीताई मिसाळ, आमदार भीमराव अण्णा तापकीर, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार सुनील कांबळे, आमदार योगेश टिळेकर, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, शहराचे सर्व सरचिटणीस, प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.