वाढवण बंदरापाठोपाठ राज्य शासनाकडून पालघर जिल्ह्यातील मुरबे बंदराच्या उभारणीलाही मंजुरी.. पालघरसारख्या तुलनेने मागास जिल्ह्यासाठी हे प्रकल्प वरदान ठरणार – चंद्रकांत पाटील

14

मुंबई : पायाभूत सुविधांचा विकास हे मोदीजींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि राज्यातील महायुती सरकारचे प्राधान्य आहे. रस्ते, पूल, रेल्वे, बंदरे, विमानतळ, सीमाभागातील रस्ते, महामार्ग आदींवर दोन्ही सरकारांनी भर दिला आहे. समृद्धी महामार्ग, अटल सेतू, मेट्रो ही महायुतीची ठळक कामे. पालघर जिल्ह्यात वाढवण येथे 76 हजार कोटी रुपयांच्या महाकाय बंदरास केंद्राने नुकतीच मान्यता दिली आहे. समृद्धी महामार्ग वाढवन बंदराशी जोडण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. पालघर जिल्ह्यातील मुरबे येथे बहुउद्देशीय बंदर प्रकल्प उभारण्यासाठी जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर विकासकाची नियुक्ती करण्यास राज्य मंत्रिमंडळ बैठकीत नुकतीच मान्यता देण्यात आली असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

चंद्रकांत पाटील यांनी माहिती देताना पुढे सांगितले कि, या संदर्भात सर्व तांत्रिक अभ्यास, मच्छिमारांचे पुनर्वसन याचा सखोल अभ्यास सीडब्लूपीआरएस , सीएमएफआरआय या तज्ज्ञ संस्थांकडून करून घेऊन सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येईल. हे बंदर बारमाही असून प्रामुख्याने या ठिकाणी कॅप्टीव्ह कार्गो आणि बल्क-ड्राय बल्क कार्गो हाताळण्यात येणार आहे. या बंदरामुळे सुमारे दिड हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी ४ हजार २५९ कोटी इतका अपेक्षित खर्च येणार आहे. पालघरसारख्या तुलनेने मागास जिल्ह्यासाठी हे प्रकल्प वरदान ठरणार असलयाचे पाटील म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.