एमआयटी विश्र्वशांती विद्यापीठाचा पुरस्कार राजा माने यांना प्रदान
पुणे : एमआयटी विश्र्वशांती विद्यापीठाचा समर्पित जीवन गौरव पुरस्कार संपादक, माध्यम तज्ज्ञ व राजकीय विश्लेषक तसेच डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांना एमआयटी विद्यापीठ व समुहाचे संस्थापक डॉ.विश्वनाथ कराड यांच्या हस्ते बहाल करण्यात आला.लोणी काळभोर येथील जगातील सर्वात उंच म्हणून नोंद झालेल्या शांती घुमटात हा शानदार सोहळा पार पडला.
विज्ञान, तत्त्वज्ञान आणि आध्यात्म विश्र्वशांती चळवळीतील दहाव्या जागतिक विश्र्वशांती अधिवेशनाच्या दुसरा दिवसाच्या सत्रात हा सोहळा संयोजक डॉ.विश्वनाथ कराड आणि भारतीय महासंगणकाचे जनक शास्त्रज्ञ डॉ.विजय भटकर यांनी आयोजिला होता.गेल्या चाळीस वर्षांत राजा माने यांनी समर्पित भावनेने पत्रकारितेत केलेल्या सेवेचा गौरव करण्यात आला.यावेळी डॉ.कराड यांनी आपल्या भाषणात विश्र्वशांती चळवळीची महती विषद केली. या चळवळीतील पत्रकारांच्या सहभागाची गरज त्यांनी स्पष्ट केली.