कोथरूड मधील व्यावसायिकांना ऊन, वारा पाऊस यापासून संरक्षण मिळावे यासाठी चंद्रकांत पाटील यांनी छत्री आणि आसन व्यवस्था वाटप उपक्रम घेतला हाती
पुणे : पारंपारिक कारागिरांचे कौशल्य टिकावे व त्यातून त्यांची आर्थिक उन्नती व्हावी, असा देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा नेहमीच आग्रह असतो. यासाठीच त्यांनी देशात “विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना” जाहीर केली. या योजनेच्या माध्यमातून देशातील ३० लाख कारागिरांना लाभ मिळत आहे. यातील एक घटक म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील गटई काम करणारे कारागीर! उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील आपल्या मतदारसंघात हा उपक्रम हाती घेतला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता झाडाखाली किंवा रस्त्याच्या एका कडेला बसून हे कारागीर काम करतात. कोथरुड मतदारसंघातील अशा व्यावसायिकांना काम करत असताना ऊन, वारा पाऊस यापासून संरक्षण मिळावे यासाठी चंद्रकांत पाटील यांनी छत्री आणि आसन व्यवस्था वाटप उपक्रम हाती घेतला. काल काही कारागीर बांधवांना हे साहित्य उपलब्ध करून देत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.