नवरात्र म्हणजे स्त्रीमधे असलेल्या अद्भुत अशा शक्तीचा जागर… ‘समुत्कर्ष’ ग्राहक पेठेची निर्मिती करून याच शक्तीचा जागर करण्याचा प्रयत्न – चंद्रकांत पाटील
पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोठुर्ड मतदारसंघात अनेक सुखसुविधा उपलब्ध केल्या आहेत. अनेक गरजूना मदतीचा हात पुढे केला आहे. यातीलच एक म्हणजे ‘समुत्कर्ष’ ग्राहक पेठ. महिला सक्षमीकरण हि काळाची गरज आहे. त्यामुळे महिलांच्या कल्याणासाठी चंद्रकांत पाटील हे सातत्याने पुढाकार घेत आहेत. महिलांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी पाटील यांनी समुत्कर्ष ग्राहक पेठ सुरु केली.
चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने सुरु झालेल्या या पेठेमुळे महिलांच्या बचत गटांच्या हस्तकलेला आणि उत्पादनांना बाजारपेठ मिळाली. या उपक्रमामुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनत आहेत. या पेठेत सर्व उत्पादने २० टक्के सवलतीने मिळत आहेत. ही उत्पादने २० टक्के सवलतीच्या दराने उपलब्ध असल्याने माता-भगिनी, ग्राहक आणि विक्रेते यांचा समान उत्कर्ष होत आहे.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, ज्या घरातील महिला आर्थिकदृष्ट्या आत्मानिर्भर असते ते संपूर्ण घर पुढारलेले असते. घरातील महिला सशक्त आणि सक्षम झाली तर ती संपूर्ण घराचा विकास साधते. महिला सक्षमीकरणाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून महिलांच्या प्रगतीसाठी ‘समुत्कर्ष’ ग्राहक पेठेची मुहूर्तमेढ कोथरुडमध्ये रोवली. यात किराणा सामानासह महिला बचत गटांच्या उत्पादनांनाही व्यासपीठ मिळाले आहे. विशेष म्हणजे ही उत्पादने २० टक्के सवलतीच्या दराने उपलब्ध असल्याने माता-भगिनी, ग्राहक आणि विक्रेते यांचा समान उत्कर्ष होत आहे. नवरात्र म्हणजे स्त्रीमधे असलेल्या अद्भुत अशा शक्तीचा जागर. ‘समुत्कर्ष’ ग्राहक पेठेची निर्मिती करून याच शक्तीचा जागर करण्याचा प्रयत्न केला असल्याचे पाटील यांनी म्हटले.