गणेशोत्सव काळात कोथरूडमधील माता-भगिनींसाठी आयोजित केलेल्या गौरी सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न

24

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील आपल्या कोथरूड मतदारसंघात वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करत असतात. यंदाच्या गणेशोत्सव काळात त्यांनी कोथरूडमध्ये गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेतील विजेत्यांना पाटील यांनी रविवारी पारितोषिक देऊन सन्मानित केले.

गणेशोत्सव काळात चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड मतदारसंघात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात केले होते. “विविध कार्यक्रमांतून एकता” हीच सांस्कृतिक राजधानीचे शहर असलेल्या पुण्याची खरी ओळख आहे. ह्याच भावनेतून गणेशोत्सव काळात कोथरूडमधील माझ्या माता-भगिनींसाठी गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी या उपक्रमाचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला. यावेळी पाटील यांनी स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देऊन सन्मानित केले. या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता.

Get real time updates directly on you device, subscribe now.