विजयादशमी निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विद्यापीठ विभागाच्या वतीने आयोजित पथ संचलनात आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला सहभाग
पुणे : आज विजयादशमी निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विद्यापीठ विभागाच्या वतीने आयोजित पथ संचलनात आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभाग घेतला. विजयादशमीचे पथसंचलन हे सर्व स्वयंसेवक बंधूंसाठी वर्षभरासाठीची शिदोरी असते. आज या शुभप्रसंगी उपस्थित राहून पाटील यांनी अनेक जुन्या सहकाऱ्यांची भेट घेतली.
संघ विजयादशमीला आपला स्थापना दिवस साजरा करतो. 1925 मध्ये विजयादशीच्या दिवशी डॉ. बलराम कृष्ण हेडगेवार यांनी याची सुरुवात केली होती.दरवर्षीप्रमाणे यंदाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हा उत्सव सांस्कृतिक आणि धार्मिक उत्साहात साजरा करण्यात आला. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला ९९ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे विजयादशमी ही आरएसएससाठी अनेक अर्थाने महत्त्वाची आहे. डॉ बलराम कृष्ण हेडगेवार यांनी 1925 मध्ये विजयादशीच्या दिवशी RSS ची स्थापना केली. आज जगभरातील अनेक देशांमध्ये आरएसएसच्या शाखा स्थापन झाल्या आहेत.