प्रत्येक महिला व नागरिक यांचे जीवनमान उंचवण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे, असा विश्वास – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

9

पुणे : भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश व कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या वतीने कोथरूडमधील अधिकृत नोंद झालेल्या लाभार्थी बांधकाम व घरेलू कामगार यांना गृहोपयोगी वस्तूंचे वाटप उपक्रम घेण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या योजनेतून हा उपक्रम झाला. यावेळी आयोजित कामगार लाभार्थी मेळाव्यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, यावेळी गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी महिलांसाठी राबविलेल्या योजना उपस्थितांना समजावून सांगितल्या. प्रत्येक महिला व नागरिक यांचे जीवनमान उंचवण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे, असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, महाराष्ट्र प्रदेश कामगार मोर्चा प्रदेशाध्यक्ष अॅड विजय हरगुडे, पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, कोथरुड दक्षिण मंडल अध्यक्ष डॉ.संदीप बुटाला, कोथरुड उत्तर मंडल अध्यक्ष सचिन पाषाणकर, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, महाराष्ट्र प्रदेश कामगार मोर्चा उपाध्यक्ष बाळासाहेब टेमकर, लोकसभा संयोजक दिपक पोटे, ओबीसी मोर्चा प्रदेश सरचिटणीस प्रल्हाद सायकर, कोथरुड विधानसभा संयोजक गणेशभाऊ कळमकर, कामगार मोर्चा संघटन सरचिटणीस हनुमंत लांडगे, प्रदेश उपाध्यक्ष भुषण पाटील, महेंद्र पासलकर, चिटणीस नितीन जांभळे पाटील, सुषमा कांबळे, संदिप साकोरे, नगरसेविका मंजुश्रीताई खर्डेकर, कोथरूड मंडल माजी अध्यक्ष प्रकाश बालवडकर, सरचिटणीस अनुराधाताई येडके, दीपकभाऊ पवार, महिला मोर्चा कोथरूड सरचिटणीस विद्या बाळासाहेब टेमकर, ओबीसी मोर्चा कोथरूड अध्यक्ष राजभाई तांबोळी आदी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.